file photo 
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण ?

मधुकर कांबळे

औरंगाबाद -  जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या मीना शेळके अध्यक्षपदी निवडल्या गेल्या तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल.जी. गायकवाड यांची निवड झाली आहे. मात्र आता विरोधी पक्षात कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीनंतरच आता विरोधी पक्षात कोण हे स्पष्ट होईल. 

यापुर्वी राज्यात शिवसेना भाजप युती मात्र जिल्हा परिषदेत शिवसेना, कॉंग्रेस अशी आघाडी होती. आता तर राज्यात महाविकास आघाडी झाली असल्याने जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी कायम राहील आणि शिवसेनेचा सहज अध्यक्ष होईल अशा राजकीय चर्चा सुरु होत्या. मात्र शिवसेनेच्याच सदस्य असलेल्या आणि गेली अडीच तीन वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी केली.

श्रीमती डोणगावकर यांनी पुर्वीचे कॉंग्रेसचे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबतच शिवबंधन बांधलेल्या सहा सत्तार समर्थक आणि भाजपशी हातमिळवणी करुन मी पुन्हा अध्यक्ष होणार म्हणत महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके यांच्या विरोधात मैदानात उभ्या राहिल्या. गेली दोन अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचे सदस्य जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या आसनात बसत होते. त्या भाजपची श्रीमती डोणगावकर यांनी मदत घेतली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली आणि महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक मत आणि अपक्षाचे एक अशी दोन मते फुटल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान प्रत्येकी 30 पडलेली मते उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपचे एल.जी. गायकवाड यांच्या पारड्यात पडले ते विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या शुभांगी काजे यांचा पराभव झाला. आता अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल.जी. गायकवाड विराजमान झाल्याने विरोधी पक्षात कोण बसणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि वित्त व बांधकाम समिती या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया करण्याविषयी आठवडाभरात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्हा परिषदेत संमीश्र वातावरण असल्याने विरोधी पक्षात कोण हा पेच निर्माण झाला असला तरी विषय समिती सभापतींची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षात कोण बसणार हे स्पष्ट होईल असे सुत्रांनी सांगीतले. 
....... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT